Monday, June 22, 2026
HomeUncategorizedआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते दाताळा येथील सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते दाताळा येथील सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन.

सत्यशोधक न्यूज महाराष्ट्र

मुख्य संपादक .राजू एन शंभरकर. मो.9511673435

ग्रामपंचायत दाताळा येथे सदगुण सोसायटीत सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. सदर विकासकामाची अंदाजित किंमत ५० लाख रुपये असून लवकरच या सामाजिक सभागृहाचे बांधकाम सुरू होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला नामदेव डाहुले, उपसरपंच विजयलक्ष्मी नायर, सदस्य बंडू मत्ते, शुशांत शर्मा,मधुकर निवलकर, प्रतिभा काळे, प्रतिभा किरमीरे, करण नायर, छाया डांगे, प्रकाश मोहुर्ले, राजू विरुटकर, गजानन मत्ते, निमिन मोहुर्ले, झोडे, आकलुरवार आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून शहरी भागासोबतच ग्रामीण भागाच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात निधी आणला जात आहे. या निधीतून ग्रामीण भागात मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विशेषतः ग्रामीण भागात अभ्यासिका आणि समाजभवनांच्या निर्मितीवर आमदार जोरगेवार यांचा अधिक भर आहे. दाताळा येथे समाजभवन निर्मिती करावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. याची तातडीने दखल घेऊन आमदार जोरगेवार यांनी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला. सदर कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारची सुविधा अत्यंत आवश्यक आहे. हे सामाजिक सभागृह ग्रामस्थांच्या विविध उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल आणि ग्रामविकासाला चालना देईल. गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. दाताळा गावातील सदगुण सोसायटीत उभारल्या जाणाऱ्या सामाजिक सभागृहामुळे ग्रामस्थांना विविध कार्यक्रमांसाठी एक सुसज्ज जागा मिळणार आहे. यामुळे गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नवे बळ मिळेल. केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular