मुख्य संपादक राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो .न.9511673435
आज दिनांक – 08 आगष्ट 2025 रोजी आजाद समाज पार्टी घुग्घुस चा वतीने सुरेश मल्हारी पाईकराव विदर्भ सचिव आजाद समाज पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रिताताई देशकर जिल्हा महासचिव यांच्या नेतृत्वात नगर परिषद घुग्घुस ला निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
घुग्घुस बस स्टँड येथील घाण व पाण्याची गळती होत असून
तसेच ग्रामीण रुग्णालय मागील परिसरात सांडपाणी व घाणीमुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता बाबात.
, घग्घुस येथील बस स्टँड मधील शौचालयातील मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असून, गटाराचे झाकण उघडे पडलेले आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचलेले असुन त्यामुळे दुर्गंधी, माशा, डास, मच्छराचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
तसेच, ग्रामीण रुग्णालय मागील परिसरात खूप मोठ्या प्रमाणात कचरा व सांडपाणी साचले आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व दूषित हवामान तयार झाले असून, या ठिकाणी राहणाऱ्या व ये – जा करणार्या नागरिकांना श्वासनाचे, त्वचेचे व इतर आरोग्याचे धोका निर्माण होत आहे.
तरी आपणास आजाद समाज पार्टीचा माध्यमातून खालील मागण्याची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी.
मागणी खालील प्रमाणे
- घुग्घुस बस स्टँड येथील गटाराचे झाकण तात्काळ दुरुस्त करावे.
- सांडपाणी गळती थांबवण्यासाठी योग्य पद्धतीने पाइपलाईन दुरुस्त करावी.
- घुग्घुस सरकारी दवाखान्याच्या मागील परिसराची सफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी.
- नाल्यांची नियमित सफाई करावी व कीटकनाशक फवारणी करावी.
- सदर ठिकाणी सोलिड वेस्ट मॅनेजमेंटची प्रभावी व्यवस्था करावी.
तरी आपणास विनंती आहे की लवकरात लवकर या वरील मागण्या पूर्ण करण्यात याव्यात.
अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन सादर करतांना आजाद समाज पार्टी जिल्हा महासचिव रिताताई देशकर, लताताई धोटे, शोभाबाई पाईकराव, विद्याताई दुबे, वैशालीताई भालशंकर,
आदी उपस्थित होते.


