Wednesday, April 29, 2026
Homeदौंडदौंड मध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर,इतर पक्ष्यांची उमेदवारी अजून गुलदस्त्यातच,चौरंगी लढतीची...

दौंड मध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर,इतर पक्ष्यांची उमेदवारी अजून गुलदस्त्यातच,चौरंगी लढतीची चर्चा

मुख्य संपादक / राजू शंभरकर

भारतीय जनता पार्टी पक्षाच्यावतीने दौंड विधानसभेसाठी विद्यमान आमदार राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच दौंडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

आमदार राहुल कुल यांच्या उमेदवारीचा जल्लोष करण्याकरिता दौंड चे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया ,तसेच नगरसेवक ,  आरपीआयचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे कुल कटारिया गटाचे आजी-माजी नगरसेवक व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आमदार कुल यांना शुभेच्छा दिल्या

याबाबत कुल यांनी बोलताना, भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने दौंड विधानसभा मतदार संघातून माझ्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली त्याबद्दल त्यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच केंद्रीय निवडणूक समिती, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचे सांगितले.

दौंड मध्ये भाजप ची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांच्या विरोधात इतर विरोधी पक्षांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे उमेदवारी साठी कोणाची वर्णी लागते याकडे मात्र दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.तसेच रा.स.प.साठी ही काही लोक इच्छुक आहेत त्यामुळे दुरंगी लढत होती की तिरंगी का चौरंगी अद्यापही हा विषय गुलदस्त्यात.

पत्रकारांनी विचारले असता दौंड तालुक्याला अद्याप मंत्री पद भेटलं नाही तर त्याबद्दल आपल काय भावना आहे आणि निवडणुकीला सामोरे जाताना आपण मतदारांना काय सांगू इच्छित आहे? तेव्हा आमदार राहुल कुल यांनी सांगितले की,”दौंड तालुक्याला मंत्री पद न मिळाल्याची सल मनामध्ये नेहमी राहीली आहे आणि निवडणुकीला सामोरे जाताना सामाजिक ,सार्वजनिक व व्यक्तिगत असे सर्वोतोपरी कार्य दौंड तालुक्यात केले. आरोग्य सुविधा,तसेच प्रांत कर्यालयासारखे प्रशासकीय कार्यालय आणि इतर विकासकामांमुळे सहज विजय होईल असा विश्वास त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.असे त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.”

तसेच भा.ज.पा ची उमेदवारी जाहीर होताच विविध सामाजिक ,जातीचे ,धर्माचे लोकांनी कुल यांना प्रत्यक्ष भेटून निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular