दिव्यांग कौशल्य विकास संस्थेच्या नवीन कार्यालयाचे भव्य उद्घाटन
मुख्य संपादक:- राजु एन शंभरकर
मो 9511673435
चंद्रपूर, दि. –21/1/2025
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या दिव्यांग कौशल्य विकास संस्था यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मा. डॉ. मंगेश गुलवाडे (सचिव इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या विशेष प्रसंगी गरजू दिव्यांग व्यक्तींपैकी गोकुल कौरासे आणि सज्जात बोरा यांना संस्थेच्या वतीने इलेक्ट्रॉनिक ट्रायसायकल प्रदान करण्यात आल्या. यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात संचार आणि स्वावलंबन वाढण्यास मदत होईल.
उद्घाटन समारंभास समाज कल्याण अधिकारी मा. धनंजय साळवे सर, प्रदीप अडकिने सर, अनिल दहागावकर सर, धनंजय तावडे सर, सुदेश भालेकर सर, भास्कर झलके सर, प्रा. दुषंत नगराळे, सचिन कन्नाके, अमोल चिटमलवार आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दिव्यांग कौशल्य विकास संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाझारे यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत दिव्यांग व्यक्तींसाठी अधिकाधिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
दिव्यांग कौशल्य विकास संस्था भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे दिव्यांग बांधवांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत राहणार आहे.


