चिलम गांजासह युवक अटक; तिन गुन्हे दाखल
चंद्रपूर, /दि .29/01/2025
मुख्य संपादक: राजू एन. शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो .न 9511673435
चंद्रपूर शहरातील स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना गोपनीय माहीत मिळाल्यावरून चंद्रपूर शहर परीसरातील बाबुपेठ गार्डन आणि कामगार चौक परिसरात दोन युवकांना गांजा चिलम मध्ये भरून सेवन करीत असतांना दिसतात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना ताब्यात घेत जेरबंद केले.
त्यांचा विरुद्ध कलम २७ एन.डी.पी.एस अॅक्ट नुसार वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहीती पोलिस सूत्रानुसार प्राप्त झाली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर निरीक्षक महेश कोंडावार यांचा नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे PSI मधुकर सोमलवार, संतोष येलपुलवार, सुरेंद्र महंतो, सतीश अवथरे, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, प्रमोद कोटनाके, मिलींद टेकाम यांनी केली.
चंद्रपूर जिल्हा पोलिस वार्तापत्राद्वारे आवाहन
तसेच नागरीकांना आवाहन पण केले की,अंमली पदार्थ खरेदि- विक्री सेवन बाबत कसल्याही प्रकारची माहीती असल्यास तात्काळ पोलिस नियंत्रण कक्ष चंद्रपूर यांना ११२ नंबर डायल करून hh नशा मुक्त सहकार्य करावे असे पोलिस वार्तापत्रात सांगितले आहेत.


