मुख्य संपादक :राजु ना. शंभरकर
चंद्रपूर (दि.31)- विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 निःपक्षपाती शांतताप्रिय वातावरणात पार पाडण्यासाठी संशयित रोख रखमेची वाहतुक करणार्याविरूध्द कारवाई करण्यात सज्ज असलेले जिल्ह्यातील ठिकठिकाणी SST पाईंट नाकाबंदी तसेच SST पथक तयार केले असता, पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या बातमीदारचा गोपनीय माहितीवरून वरोरा हद्दीतील पोलिस व SST पथकांचा संयुक्त रीत्या मोठि कारवाई केली त्यातच आता एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या दरम्यान पेट्रोलिंग करीत असतांना एका चारचाकी वाहनांची पोलिस व SST पथकांनी तपासनी केली असता सदर वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात 75 लाख रूपयांची रोकड आढळून आली संबंधित व्यक्ति कडे चौकाशी केली असता, त्या रकमेबाबत योग्य माहीती देता आली नसल्याने, योग्य पंचनामा करत रोख रक्कम जप्त करीत आयकर विभागाचा स्वाधीन करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंदू यांचा मार्गदर्शनात सहा.पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांचे नेतृत्वात वरोरा पोलिस, एस एस टि पथक यांनी संयुक्त रित्या केली आहे.


