
मुख संपादक:- राजू शंभरकर
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक पोलिस स्टेशन भिशी हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मुखबिराकडून गोपनीय माहिती देण्यात आली असता, मौजा शंकरपुर येथील एका शेताचा शिवारात काही ईसम 52 तासपत्त्यांवर पैसे लावुन अवैध जुगार खेळत आहे.
या खात्रीशीर दिलेल्या माहितीनुसार मौजा शंकरपुर शेत शिवारात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चा पथकांनी धाड टाकली
असता, 3 लाख 77 हजार 800 रुपयांचा ईतर साहित्य, रोख रकमेसह मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला.
या दरम्यान चिमूर तालुक्यातील सात ईसमासह ईतर ईसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये पोलिस स्टेशन भिसी येथे अपराध क्रमांक 201/2024 कलम 12 (अ) म.जु.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई सहा. पोलिस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलिस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, संतोष निंभोरकर, किशोर वैरागडे रजनीकांत पूठावार, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार यांनी केली.


