सत्यशोधक न्यूज गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी:-शंकर मुत्येलवार मो.8830787817
एट्टापली तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा बुर्गी येथील विज्ञान शिक्षक श्री वैभव चिमरालवार यांची शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड झाली आहे…
तसेच त्यांच्या मार्गदर्शनात कु सविता इशू पुंगाटी आणि श्रीजा अग्गुवार या विदयार्थ्यांनी सादर केलेली “बहुउपयोगी पंखा ” या प्रतिकृती ला आदिवासी गटातून प्रथम क्रमांक प्राप्त झाले..
चिमरालवार सरांनी याआधी शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत 4 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे हे येथे उल्लेखनीय आहे…
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय वनवैभव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय बबलू भैय्या हकीम व मार्गदर्शिका आदरणीया शाहीन भाभी हकीम यांना दिले.



