Thursday, April 30, 2026
HomeUncategorizedआमदार देवतळे यांच्या हस्ते बॉक्सिंग कौशल्य विकास शिबिराचे उद्घाटन*

आमदार देवतळे यांच्या हस्ते बॉक्सिंग कौशल्य विकास शिबिराचे उद्घाटन*

सत्यशोधक न्युज

मुख्य संपादक:-राजु एन शंभरकर

मो.न:-9511673435

सत्यशोधक न्युज- चंद्रपूर

स्थानिक विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील श्री महायोगी अरविंद सभागृहात तांत्रिकदृष्ट्या, तंत्रशुद्ध बॉक्सिंग कौशल्य विकास शिबिराचे वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिर उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, विशेष अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सिंग प्रशिक्षक, बॉक्सिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक, तामिळनाडू इथून आलेले शिवकुमार पाल, तहसीलदार भद्रावती राजेश भांडारकर, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव डॉ.राकेश तिवारी, भद्रावती बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट मिलिंद रायपुरे, बॉक्सिंग राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, एडवोकेट मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिबीराचे उद्घाटनकेहे असता,आमदार करण देवतळे यांनी आपल्या मार्गदर्शनात भद्रावती क्रीडा संकुल येथे अद्यावत क्रीडा सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आणि 2036 ऑलिंपिक मध्ये भद्रावती शहरातून ऑलम्पिक वीर घडवणार अशी त्यांनी ग्वाही दिली, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सुविधा उपलब्ध झाल्यास नक्कीच भारताला ऑलम्पिक मध्ये पदक प्राप्त होईल आणि ते पदक भद्रावती शहरातील एखाद्या खेळाडू कडूनच भारताला मिळेल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेची ६ एकर जमीन क्रीडा क्षेत्रासाठी विकसित करण्यात येईल आणि ते करून देऊ असे म्हटले. विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना भद्रावती, भद्रावती क्रीडा संकुल समिती भद्रावती आणि भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटना भद्रावती यांच्या तर्फे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमदार करण देवतळे आणि शिवकुमार पाल यांचा सत्कार करण्यात आला चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग या खेळाचे पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राकेश तिवारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे, संचालिका शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग विवेकानंद महाविद्यालय भद्रावती आणि आभार प्रदर्शन विजय डोबाळे यांनी केले.
या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील बॉक्सिंग खेळाडू, बॉक्सिंग प्रेमी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता लता इंदुरकर, वर्षा कोयचाळे, रोहन मोटघरे, अलोका विश्वास, अमर भंडारवार, नेहाल डांगे, कोमल वाकडे, विद्या किनाके, प्रशांत निखाडे, प्रीती बोरकर, दिनेश धानोरकर, संजय बेले, सुनील दैदावार, विजय लांबट, डॉ. दिलीप बगडे, डॉ. अमित प्रेमचंद, शितल मांडवकर, महेंद्र तिवारी, यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular