Thursday, April 30, 2026
HomeUncategorizedशेतकऱ्यांकडून होणाऱ्या पिकाचे नुकसान भरपाई करण्याची मागणी

शेतकऱ्यांकडून होणाऱ्या पिकाचे नुकसान भरपाई करण्याची मागणी

सत्यशोधक न्युज

मुख्य संपादक:- राजु एन शंभरकर

मो.न:९५११६७३४३५

उपायसोजना नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान

  चंद्रपूर:- तालुक्यातील टाकळी गावानजीक आदिती काॅटन जिनिंग ने कपास खरेदी सुरू केले असून, मात्र आजूबाजूस जिनिंग लगत असणाऱ्या  शेतकऱ्यांचा शेत मालाचे नुकसान पोहचणार नाही म्हणून कोणत्याही उपाय योजना केल्या गेलेल्या नसल्याचे निवेदन आमदार करण देवतळे यांना येथील १७ स्थानिक शेतकऱ्यांनी दिले.
   जिनिंग मधून निघणाऱ्या धुरा मुळे शेतातील पिंकावर बोंड-अळी च्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. शेतातील बोंडसळ, बोंडअळी कापूस काढत असतांनी शेतमजुरांचा  अंगावरील विचित्र आजाराने ग्रस्त होत असल्याने मजुर सुध्दा शेतातील काम  करण्यास तयार नाही.
    शेतातील कापून जागेवर पडत आहे. लागवळीचा खर्च सुध्दा मिळेनासा झाल्याने येथील शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आला असता, याबाबत जिनिंग व्यवस्थापनाकडून आजूबाजूस असणाऱ्या नुकसान होणार नसल्याचा कोणत्याही प्रकाराची पुर्व तयारी केली गेल्या नसल्याने,  लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई देण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.
     आमदार देवतळे यांना निवेदन सादर करते वेळी गुरूदेव हरणे, सुनिल काबंळे, विलास हरणे, आकाश मोठे, नथ्थु ठेंगणे, दिगांबर जिवतोडे, प्रमोद जिवने, शंकर जिवतोडे, मनिष गोंडे, आदि उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular