Monday, June 22, 2026
HomeUncategorized*शेतात लागलेल्या आगीने नागरिक भयभीत, तहसीलदारांनी स्वतः उपस्थित राहून विझविली आग

*शेतात लागलेल्या आगीने नागरिक भयभीत, तहसीलदारांनी स्वतः उपस्थित राहून विझविली आग

मुकेश संपादक : राजू एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9511673435.

भद्रावती,दि.१९
येथून सुमारे ६०० मीटर अंतरावर कोंढा नाल्याजवळ असलेल्या नवघरे यांच्या शेतात लागलेल्या आगीने नागरिक भयभीत झाल्याचे माहीत होताच भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
प्राप्त माहितीनुसार भद्रावती शहरापासून जवळच असलेल्या कोंढा नाल्याजवळ नवघरे यांचे शेत आहे. या शेतात दि.१९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतातील गवत, पालापाचोळा जळायला लागला.या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीच्या ज्वाळा महामार्गावर येऊ लागल्या. रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आपल्या अंगावर येणार अशी भिती या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना वाटू लागली.त्यामुळे त्यांनी आपली वाहने थांबवून आगीचे व्हिडिओ घेणे सुरू केले. याची माहिती तहसीलदार राजेश भांडारकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आयुध निर्माणी आणि नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. लगेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणली. आग विझेपर्यंत तहसीलदार भांडारकर स्वतः घटनास्थळी उपस्थित होते.त्यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्द्ल त्यांचे परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular