Monday, June 22, 2026
HomeUncategorized*आणीबाणीत लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न.

*आणीबाणीत लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न.

*आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

मुख्य संपादक : राजू एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9511673435

भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगरच्या वतीने २५ जून रोजी आणीबाणी जाहीर होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘आणीबाणी काळा दिवस’ पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगर सेवक देवानंद वाढई, प्रदीप किरमे, अरुन तिखे, दिवाकर पूट्टडवार, अजय जयस्वाल, प्रविण गिलबीले, माजी नगरसेविका छबु वैरागडे, पूष्पा उराडे, शितल आश्राम, श्याम कनकम, नामदेव डाहूले, जितेश कुळमेथे, आशिष मासिरकर, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, मुग्दा खाडे, आशा देशमुख आदिंची प्रामुखतेने उपस्थिती होती
कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणीबाणीच्या काळात देशासाठी आणि लोकशाहीसाठी संघर्ष करून तुरुंगवास भोगलेल्या गिरिश अणे, हेमंत डाहाक, सुधीर टिकेकर, नारायण पिंपळापुरे, अनिल अंदनकर, कृष्णा देशपांडे, शिल्पा देशकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करणाऱ्या नागरिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सन्मान समारंभाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेले संघर्षशील दिवस आणि त्यातून मिळालेली शिकवण यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले, आणीबाणीचा काळ हा देशाच्या इतिहासातील अंधारलेला अध्याय होता. त्या काळात अनेकांनी जीव धोक्यात घालून सत्याची बाजू घेतली. आज आपण त्यांना स्मरण करतो आहोत आणि त्यांचं योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहोत, ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. भारताची लोकशाही मजबूत राहिली, याचं श्रेय अशाच संघर्षशील नागरिकांना जातं. आपण सर्वांनी मिळून ही लोकशाही अधिक सशक्त आणि जबाबदार बनवायला हवी. भारतीय जनता पक्ष लोकशाहीच्या मूल्यांवर चालतो, असे ते म्हणाले.
तर यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, आपण आज ज्या स्वातंत्र्याने बोलतो, वावरतो, मतदान करतो, ते सहजसाध्य नाही. यामागे तत्कालीन आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी झगडलेले अनेक योद्धे आहेत. त्यांनी तुरुंगवास पत्करला, नोकऱ्या गमावल्या, पण संविधान आणि नागरिकांच्या हक्कांपासून तडजोड केली नाही. आज त्यांचा सन्मान करून आपण लोकशाहीच्या मूळ मूल्यांना अभिवादन करत आहोत. ही लोकशाही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ती जपणं हे आपलं कर्तव्य आहे असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular