संपादक राजेंद्र आर तराले
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो .न.9404862389
बल्लारपूर (ता. 07 ऑगस्ट 2025):
मौजा हडस्ती येथील शेतकरी सुनील नामदेव खोके यांच्या शेतात सकाळच्या सुमारास अचानक वीज कोसळून मोठा अपघात घडला. वीजेच्या तीव्र धक्क्याने त्यांच्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला, ज्यांची अंदाजे किंमत सुमारे दीड लाख रुपये होती.
ही घटना समजताच भाजपा तालुका अध्यक्ष (ग्रामीण) पिंटू देऊळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पटवारी व पशुविकास अधिकारी यांना संपर्क करून पंचनामा व पोस्टमार्टम तात्काळ करण्यास भाग पाडले. डॉ. जांभुडे व डॉ. पीदुरकर यांनी घटनास्थळी येऊन बैलांचे पोस्टमार्टम केले आणि पंचनामाही पूर्ण केला.
यानंतर पिंटू देऊळकर यांनी भाजपा नेते व राज्याचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला व संपूर्ण माहिती दिली. सुधीरभाऊंनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून शेतकऱ्याला शक्य तितकी लवकर मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले.
पिंटू देऊळकर यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी, जेणेकरून त्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून निघू शकेल.


