मुख्य संपादक राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9511673435
बल्लारपूर तालुक्यातील मौजा हडस्ती येथील शेतकरी सुनील नामदेव खोके यांच्या शेतात दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी सकाळच्या सुमारास वीज कोसळून मोठी दुर्घटना घडली. विजेच्या जोरदार आवाजाने संपूर्ण परिसर हादरला आणि या दुर्घटनेत खोके यांच्या दीड लाख रुपये किंमतीच्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भाजपा कार्यकर्ते पिंटू देऊळकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित पटवारी व पशुविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पंचनामा व पशुपोस्टमार्टम प्रक्रिया त्वरित सुरू करण्यास भाग पाडले.
पशुधन विकास अधिकारी डॉ. जांभुडे व डॉ. पीदुरकर यांच्या उपस्थितीत घटनास्थळी जाऊन बैलांचे पोस्टमार्टम करण्यात आले व पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसानभरपाईसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली.
पिंटू देऊळकर यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, जेणेकरून त्यांचे आर्थिक नुकसान थोपवता येईल.


