मुख्य संपादक -राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्युज महाराष्ट्र
मो.न.9511673435
चंद्रपूर, दि. ५ जुलै : पद्मभूषण, लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक तथा ज्येष्ठ समाजनेते रामविलास पासवान यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास लोक जनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रभारी ॲड. वामशीकृष्णा अरिकिल्ला, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ ठेंगणे, विदर्भ युवा अध्यक्ष सुनील ठाकूर, विदर्भ किसान सेल अध्यक्ष नंदकिशोर रेड्डीवार, कामगार नेते निलेश हिवराळे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय रामविलास पासवान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनकल्याणकारी कार्याचा आढावा घेत त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, सर्वसमावेशक नेतृत्व आणि समाजातील वंचित, गरीब व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाविषयी मार्गदर्शन केले.
उपस्थित सर्वांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन समाजसेवा, सामाजिक न्याय आणि जनहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना मिठाई वाटप करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.



