राजू एन शंभरकर मुख्य संपादक
मो.9511673435
पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे फिर्यादी श्री. 38 वार्षिक मंजुल सुनिल जैन , रा. पंचशिल चौक, झाडे हॉस्पीटलजवळ, चंद्रपूर यांनी दिनांक १५/१२/२०२४ रोजी तकार दिली की, फिर्यादी हे आपली ॲक्टिव्हा कंपनीचे मोपेड गाडी क्र .एम.एच. ३४ सि. के. ३२१० हि नेहमीप्रमाणे झाडे हॉस्पीटल ते पंचशिलकडे जाणाऱ्या रोडवर हॅन्डल लॉक करून ठेवली होती. सकाळी फिर्यादी हे बाहेर जाण्यास निघाले तेव्हा सदर गाडी हि दिसुन आली नाही. दि. १३/१२/२४ चे २३/०० वा. ते दि. १४/१२/२४ चे ०७/३० वा. दरम्यान ॲक्टिवा मोपेड गाडी क्र.एम.एच. ३४ सि.के. ३२१० कि. १,००,०००/- रू. ची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून तपास सुरु केले असता गुन्ह्याचे गांर्भीय बघता मा.उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. पोनि. प्रभावती एकुरके मॅडम यांचे मार्गदर्शनात गुन्हयातील अज्ञात आरोपीचा मुखबीरच्या खबरेवरून शोध घेउन पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील डी.बी पथक मधील पोउपनि. संदिप बच्छीरे तसेच डि.बी. कर्मचारी यांनी पो.स्टे. परिसरात आरोपी शोध कामी रवाना होवुन गुप्त बातमीदाराच्या आधारे माहिती मिळताच नमुद आरोपीस ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा कबुल केल्याने त्याचेकडुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीचे नावः- १) शाकिर नबी शेख, वय २३ वर्षे, रा. बिनबा गेटजवळ, सिस्टर कॉलनी चंद्रपुर
जप्त माल :-
१) एक पांढऱ्या रंगाची एक्टिवा कंपणीची मोपेड गाडी क. एम.एच. ३४ सि.के. ३२१
अ.किं. १,००,०००/-रु
२) एक कथ्या रंगाची एक्टिवा कंपणीची मोपेड गाडी बिना नंबर प्लेटची जिचा इंजीन नं. JF50EU5625336, चेचीस नं. ME4JF507KHU625325 किं. ७०,०००/
असा एकुण १,७०,०००/- रू चा माल जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रभावती एकुरके मॅडम चंद्रपुर शहर, पो.उप.नि. संदिप बच्छीरे, कपुरचंद खरवार, सचिन बोरकर, संतोष कनकम, भावना रामटेके, इम्रान खान, दिलीप कुसराम, ईरशाद खान, रूपेश रणदिवे, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली आहे. पुढील तपास म.पो.हवा. भावना रामटेके हे करित आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा प्रतिनिधी करिता इच्छुक उमेदवारांनी
वरील मोबाईल वर संपर्क करा.



